Palghar Nargrik

Breaking news

पालघर चार रस्त्ता ठिकाणी ट्रकचा ब्रेक फेल; ६ गाड्यांचा भीषण अपघात…..

पालघर मधील चार रस्ता या ठिकाणी अपघात झाला असून यात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. ट्रकने ज्या वाहनांना धडक दिली त्यात एक दुचाकी, कार,टेम्पो,रिक्षाचा समावेश आहे.

यामध्ये गाड्यांचा नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. चार रस्ता याठिकाणी दुपारी बाराच्या दरम्यान एक ट्रकचा ब्रेक फेल झाले.मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अपघातानंतर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या घटनेने परिसरात एकच गोंधळ आणि खळबळ उडाली. नेमकं काय झालं याबाबत नागरिकांना सुरुवातीला काही कळलेच नाही.

Leave a Comment