मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीड़ा दिना निमित्त मुंबई व नाशीक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मैदानी स्पर्धेत,पालघर जिल्ह्यातील पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीड़ा अधिकारी, सूहास व्हनमाने,,प्रकाश वाघ ,.राकेश सावे, तसेच विजेते खेळाडू आणि खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
. जिल्ह्याला एथलेटिक्स , बॅडमिंटन राज्य स्पर्धा तसेच विविध खेळ प्रकारात,प्रथमच 13 पदके प्राप्त झाले आहे.
. विजेत्या खेळाडूंनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके .यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.