मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस बरसतोय.मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण झालाय. मुंबईसह ठाणे , नवी मुंबईत आणि रायगडमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यात गेले काही दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. मात्र पावसाच्या या हजेरीमुळे मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झालीय.