पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून दि.३१/०८/२०२२ पासून पालघर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणेत ” जनसंवाद अभियान” सुरू करण्यात आले आहे. सदर अभियानाअंतर्गत पोलीस ठाणेत नेमणूकीत असलेल्या प्रत्येक पोलीस अंमलदार प्रत्येकी एका गावचा जलसंपर्क अमलदार म्हणून कार्यरत राहील व तो गावातील सरपंच, पोलीस पाटील, शांतता मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांच्या संपर्कात राहून गावातील प्रत्येक सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गावातील दैनंदिन घटना गावातील नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण करतील त्याचबरोबर त्याच सोबत नेमण्यात आलेल्या अंमलदार प्रत्येक गावचा एक व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करेल. सदर ग्रुप मध्ये गावातील सर्व संभाव्य घटनांबाबत तसेच इतर माहितीचे संदेश प्रसारित करण्यात येतील गावची प्रत्येक आठवड्याकरिता एक सभा आयोजित करून गावातील जनतेचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यात येतील त्यामुळे पोलीस व जनता यामध्ये समन्वय सुसंवाद प्रस्थापित करता येईल.
त्या अनुषंगाने मनोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सव सणाच्या अनुषंगाने दि.०३/०९/२०२२ रोजी मनोर पोलीस ठाणे या ठिकाणी सत्यनारायण पूजा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी,मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रदीप कसबे,तसेच इतर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार,पालघरचे तहसीलदार शिंदे साहेब व गावचे सरपंच पोलीस पाटील शांतता मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक हे या ठिकाणी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे बोईसर पोलीस स्टेशन, सफाळे पोलीस स्टेशन, वाणगाव पोलीस स्टेशन, या ठिकाणी सुद्धा “जनसंवाद अभियान” राबवण्यात आली होती. पोलिस २४ तास आपल्या देशाची सेवा करण्यात मग्न असतात.पोलिस भावाने आपल्या देशाची सेवा करतात, देशातील सर्व अडचणी सोडवण्यात पोलीस सक्षम असतात.देशात असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांचे काम खूप कठीण असते. समाजामध्ये कानून आणि व्यवस्था कायम ठेवणे, समाजातील सर्व नागरिकांची रक्षा करणे अशी अनेक कार्य पोलिस करत असतात.
पालघर जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे,यामुळे पोलिसांना बंदोबस्त लागतो. व त्यांना सणाच्या दिवशी सुद्धा ते आपल्या परिवारसोबत सण साजरा करू शकत नाही. परंतु एस पी साहेबांनी जी अभियान राबविण्यात आली त्यामुळे पोलिसांना आपल्या परिवारासोबत गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
तसेच सर्व पोलीस डिपार्टमेंटला पालघर नागरिकच्या वतीने स्वागत आहे.व त्याचा अभिनंदन करत आहोत.
आपला पोलीस मित्र संपादक जावेद मजीद लूलानिया कडून हार्दिक शुभेच्छा