Palghar Nargrik

Breaking news

ठाकरे नी महाराष्ट्रात आणलेला उद्याग… आता गुजरातला नेला…….

मविआ सरकारच्या काळात उद्धवजी ठाकरे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे व इतर संबंधित लोकांनी २०२०-२१ कालावधीत वेदांता-फॉक्सकॉन कंपनीसोबत बोलणी केली. अनेक बैठका झाल्या.

वेदांता-फॉक्सकॉन ने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक क्लस्टर झोनमध्ये तब्बल २ लाख कोटींचा सेमीकंडक्टर निर्मिती आणि जोडणी प्रकल्प स्थापित करायचं ठरवलं होतं.

या प्रकल्पातून सर्व संबंधित घटकांद्वारे साधारण दीड लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात ठोस रोजगार उपलब्ध होणार होता. पुणे व आजूबाजूच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार होतं. क्षेत्रातील ट्रक-टेम्पो व इतर वाहतूक व्यावसायिकांना रोजगार मिळणार होता. महाराष्ट्र राज्याला महसूल मिळणार होता.

परंतु, शिवसेनेतून गद्दारी करुन बाहेर पडलेल्या आमदारांमुळे महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. भाजपने शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. (सदर सत्ता स्थापनेच्या कायदेशीर वैधतेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.) आणि महाराष्ट्र होऊ घातलेला इतका मोठा प्रकल्प अतिशय गुप्तता पाळत गुजरातला वळवण्यात आला.

वेदांता-फॉक्सकॉन ने आपण हा प्रकल्प गुजरातमध्ये करत आहोत हे घोषित करेपर्यंत शिंदे-भाजप तर्फे कोणत्याही प्रकारची माहिती कोणासही दिली गेली नाही. ही सर्व प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाहीय. कोणीतरी संपूर्ण महाराष्ट्राच्या मुळावर उठलंय.

महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील युवकांची रोजगाराची संधी कटकारस्थान करून हिरावून घेण्यात आलीय. महाराष्ट्र राज्याचा महसूल हक्क जाणिवपूर्वक डावलण्यात आलाय.

आणि हे सर्व उघड्या डोळ्यांनी हताशपणे पाहण्याशिवाय महाराष्ट्रातील बेरोजगार सुशिक्षित तरुण काहीही करु शकत नाही.

‘या या या आमच्या बोकांडी बसा ‘ या अविर्भावात कोणाला डोक्यावर बसवलंय, हे समजलं तरी आता उशीर होत चाललाय.

महाराष्ट्राचे मारेकरी ओळखा रे…
… नाहीतर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत.

#महाराष्ट्र_वाचवा

Leave a Comment