महाराष्ट्रात प्रथमच महामार्गावरील ठेकेदारावर १९/०९/२०२२ रोजी १८.१५ वाजता घडलेल्या अपघाताबाबत. तलासरी पोलिसांमार्फत पोस्टे गुरन ३२३/२०२२ भादविसक ३०४(अ),२७९,३३७,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल.रस्ते चांगले असतील तर वाहतूक सुलभ आणि वेगवान होते. व्यापार-उदीम वाढतो. लोकांचे दैनंदिन जगणे सोपे बनते. याउलट रस्त्यांची दुरवस्था झाली असेल, जागोजागी खड्डे पडले असतील, रस्ता दुरूस्ती आणि देखभालीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असेल तर सगळाच खेळ बिघडतो. खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली असेल तर वाहतूक अडखळते. अपघातांना आमंत्रण मिळते.
रस्ते अपघातातून काहींच्या वाहनांचे नुकसान आणि काहींच्या जीवावर उठणारा हा नेहमीचा भाग बनतो.कर भरून नशिबी हा भोग का?’ असा संतप्त सवाल जनतेच्या तोंडून आपसूक बाहेर पडतो.
रस्त्यांवर खड्डे केवळ पावसाळ्यातच पडतात असे नाही. ग्रामीण भागातील बहुतेक रस्त्यांवर वर्षभर खड्ड्यांचीच जोपासना केली जाते. लोक ओरड करतात, पण त्यांचा आवाज सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचत नाही. एखादा बडा मंत्री रस्त्यावरून जाणार असेल तर त्या रस्त्याचे भाग्य रात्रीतून तात्पुरते तरी उजळते. एरव्ही सगळे जण शांत आणि निवांत असतात.
राष्ट्रीय महामार्गाला खिंडाऱ्या पडल्या असल्याने मार्गावरून धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे.चारोटी ते घोडबंदर राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यातून एक चाक निघाला की, दुसरा खड्डा तयारच असण्याचा अनुभव वाहन चालक घेत आहेत. रात्री या महामार्गाने प्रवास करताना जिकरीचे ठरत आहेत. खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत, परंतु साधी दुरुस्ती करण्यात येत नाही.
महामार्ग पाहणी दौऱ्यावर असताना खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकारी यांनी संयुक्तपणे महामार्ग पाहणी दौरा केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी यांचा पाहणी दौरा घोडबंदर पासून महाराष्ट्र गुजरात सीमेपर्यंत असल्याची चर्चा होती मात्र, पाहणी दौरा उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या चारोटी येथील अपघात स्थळी येऊन संपवण्यात आल्यामुळे, तलासरी बाजूला त्यांनी पाहणी केलीच नाही. जर त्यावेळी जिल्हाधिकारी यांचा पाहणी दौरा तलासरी कडे गेला असता तर कदाचित आमगाव येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात येऊन, निष्पाप नागरिकांना नाहक खड्ड्यांचे बळी व्हावे लागले नसते.
गुन्हा दाखल करण्याचे कारण ध्वनीत विनोदचंद्र पटेल याने त्याचे ताब्यातील मारुती सुझुकी इंटिगा गाडी क्रमांक डी एन ०९- जे -२६६१ ही मुंबई बाजूकडून गुजरात बाजूकडे चालवून घेऊन जात असताना ती वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात आदळून सदर अपघातात स्वतःचे व त्याच्यासोबत असलेल्या हितेंद्र हिम्मतसिंग राठोड (वय ५२) वर्ष यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचे मरणास तसेच सदरचे अपघातात त्याच्या ताब्यातील एर्टिगा गाडी रोडच्या खड्ड्यात आढळून दुसऱ्या वाहिनीवरून येणाऱ्या आयसर टेम्पो क्रमांक डीडी- ०३- पी- ९४७० यास ठोकर मारून टेम्पो मधील चालक यास किरकोळ व गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत झाला आहे. तसेच आर.के. जैन इन्फ्राटेक्चर कंपनीचे व्यवस्थापक राम राठोड तसेच इतर संबंधित अधिकारी असून त्यांच्याकडे मुंबई आमदाबाद महामार्ग दुरुस्त व देखभाल करण्याची जबाबदारी असून त्यांना महामार्गावरील पडलेले खड्डे वेळीच बुजविण्यासाठी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत माहिती असताना व जबाबदारीचे जाणीव असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी खड्डे बुजविण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे दिनांक १९/०९/२०२२ रोजी १८.१५ वाजता घडलेल्या अपघाताबाबत. तलासरी पोलिसांमार्फत पोस्टे गुरन ३२३/२०२२ भादविसक ३०४(अ),२७९,३३७,३३८ प्रमाणे महामार्गावरील ठेकेदारावर दाखल झालेल्या गुन्हयाचे घटनास्थळावरच पुन्हा सदरचा अपघात होण्यास कारणीभूत झालेले आहेत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर पाहता महामार्गावर दोन वर्षापासून सतत जोराने काम करत असलेला NH 48 ग्रुप याला आज यश मिळालं आहे. त्याने केलेल्या कामाबाबत जेवढे कौतुक करून तेवढे कमीच आहे. आणि यापुढेही NH 48 ग्रुप हा सदैव महामार्गावर नागरिकांच्या मागे तत्पर उभा राहील.त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी,आरटीओ,पोलीस अधिकारी वर्ग,आमदार निकोले साहेब,खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी वेळेचं या ठिकाणी लक्ष्य वेदित केल्यामुळे महामार्गावरील अधिकारी सरल लाईनीवर आलेले दिसत आहे.