महामार्ग 48 फाउंटन हॉटेल (घोडबंदर) ते आच्छाड (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आत्मशांतीसाठी कंत्राटदार कंपनी व प्राधिकरणाचे यांचे सांकेतिक श्राद्ध कार्यक्रम उदवाडा वलसाड येथे करण्यात आले.NH 48 information group, Owes लेट्स डू समथिंग फाउंडेशन, मानवाधिकार अभियान, ऑल इंडिया ड्रायव्हर- मालक फेडरेशन,सर्व पितृ श्राद्ध कार्यक्रम एकमेकांसोबत चांगल्या वातावरणात पार पडली.
पितृ अमावस्येच्या या कार्यक्रमात जावेद मजीद लुलानिया (पालघर नागरिकचे संपादक), हरबंस सिंग नन्नाडे (पप्पू), रविश के. नाचन (हायवे मृत्युंजय दूत), महेश धोडी (अध्यक्ष – जेएसए आदि. संघ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.
अपघात रोखण्यासाठी व मदतीसाठी यापुढील काळात सर्व प्रकारचे सहकार्य या महामार्ग 48 गटाकडून रात्रंदिवस सेवेच्या भावनेने केले जात असून यापुढेही अशीच मदत देण्याचा प्रयत्न राहील.