पालघर ::-जव्हार.जिल्ह्यात सर्वत्र जुगार, मटका अड्ड्यांमुळे तरुण वर्ग उध्दवस्त होवून आत्महत्या सारखे मार्ग अवलंबत असल्याने अवैध धंदे चालकांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जात असतांना जव्हार तालुक्यात मात्र मुभा दिले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
अवैध धंदे बंद करण्याबाबत नागरिकांनी ओरड करुन देखील पोलिस प्रशासनाच्या कानापर्यंत तो आवाज जात कसा नाही? हा मोठा संंशयाचा विषय ठरला आहे. पोलिस प्रशासनाला जनतेचा आवाज जात नाही कि स्वत:हून ते कान बंद करुन घेतात हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यावर कारवाईची संक्रांत आलेली असतांना जव्हार तालुक्यात सरार्सपणे आजही अवैध धंदे जोमाने सुरु असल्याची प्रचिती बघिल्यावर लक्षात येते.जव्हार पोलीस स्टेशन जवळच्या हद्दीत अवैध जुगार व्यवसायाची चक्रे जोमाने सुरू असून या जुगार अड्डामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थी देखील जुगाराचे आकडे लावण्यासाठी उत्सुक झाले असून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकडे न वळता जुगारी मार्गाकडे वळण्याचे आवाहन दिसत आहेत.
यामध्ये आणखी एक माहिती अशी की या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे अज्ञात कर्मचारी मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करण्यात मग्न असून त्यांना त्यांच्या प्रमुख कर्तव्यांचा विसरच पडला असल्याचे समजते आहे. अवैध धंदे चालतात ते आप्पासाहेब लेंगरेंच्या कार्यालयापासून याची साखळी दिसत आहे.
त्यांना देखील हप्ता चालू असल्याने कुणीही किती ओरड केली तरी अवैध धंदे बंंद होणार नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. अवैध धंद्याविरुध्द बोलल्यास गुंडप्रवृत्तीचे अवैध धंदे चालक पोलिसांच्या मदतीने दमदाटी करतात असा देखील आरोप होत आहे. तसेच अशपाक रशिद कुंगले यांनी सोमवारी पालघर पोलीस अधीक्षक यांना यासंदर्भात अर्ज सुध्दा देण्यात आले. व त्यांनी आपली स्वतःची एक व्हिडिओ बनवली त्या मध्ये ते बोलताना असे दिसण्यात आले की जव्हार या ठिकाणी अवैध धुमधडाक्यात धंदे जोरात चालू आहेत.यावर मी आवाज उठवला आहे.परंतु याप्रकरणात माझ्यावर (अशपाक) खोटे गुन्हे दाखल केले आहेत.आप्पासाहेब लेंगरेंचा या ठिकाणी गचाळ कारभार चालू आहे.यावर अवैध धंदे लवकरात लवकर बंद झाले नाही तर आमदार सुनील भुसारा यांना भेटून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
तरी या पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यावर काय भूमिका घेतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरेल.