बोईसर परिसर एका तरुणीवर भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या जुगल जोडीने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले.
अचानक मागून कृष्णाने स्नेहावर गोळीबार केला. या गोळीबारात स्नेहाच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी कृष्णा यादवने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला. मात्र सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.गाडीखाली आल्याने जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
टीप:- पालघर जिल्हा मध्ये असाच एक गोळीबार ८ महिने अगोदर पालघर मनोर रोड जवळ पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानिया यांच्यावर झाला होता.पण अजून पर्यंत त्यांचे आरोपी मोकाट जनावरे सारखे फिरताना दिसत आहेत.अजून पर्यंत पालघर पोलीस या प्रकरणात यशस्वी झाले नाही आहेत. असे हत्यार गावा मध्ये कशे येतात. ते घेऊन कसे घेऊन फिरतात यावर पोलिसांचा दुर्लक्ष आहे का? संपादक जावेद लुलानिया यांना अजून पर्यंत स्वतःच्या जीवाला धोका निर्माण आहे.त्यामुळे ते पालघरला न राहतात ते मुंबई मध्ये राहतात.पालघर मध्ये येतात परंतु अजून त्यांना भीती आहे.की स्वतःवर परत हल्ला होणार की काय? कारण ज्यांनी हल्ला केला आहे.म्हणजेच धनानी पासून व त्यांच्या कुटुंबीयांपासून धोका निर्माण होत आहे.व हे आरोपी पालघर पोलिसांच्या आशीर्वादाने फिरताना दिसत आहे.