Palghar Nargrik

Breaking news

पालघर येथे नवविवाहित महिलेची आत्महत्या — डॉक्टर असलेली महिलेचे सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न, आत्महत्येचे कारण अस्पष्ट,…..

पालघर शहरात सुख शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय डॉक्टर महिलेची ६ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
तृप्ती कौस्तुभ घरत असे या महिला डॉक्टरचा नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहे. तिने आत्महत्या का केले याचे कारण अस्पष्ट असून याबाबत पालघर पोलीस पुढील तपास करीत आहे.

पालघरच्या सुख शांती नगर परिसरात राहणाऱ्या तृप्ती यांचा मृतदेह मंगळवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी
गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. २८ वर्षीय तृप्ती या बीएएमएस एम.डी. डॉक्टर होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. याबाबत पालघर पोलिसांकडून कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती घरत यांच्या मृतदेहा जवळुन पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडला असून त्या सुसाईड नोट मध्ये तृप्ती कडून कोणालाही दोषी ठरविण्यात आले नसल्याने तृप्ती यांनी नेमका कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्या? याचा खोल तपास पालघर पोलीस करीत असल्याचे माहिती पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

Leave a Comment