पालघर : चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.आरोपींकडून पोलिसांनी १५,०८,६००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे आहे की, फिर्यादी नामे जिग्नेश दिपक बारी,हे नवरात्रीच्या आरतीसाठी दांडाखाली येथे गेले असता अध्यात चोरट्याने राहत्या घराच्या बेडरूमची बंद खिडकी उघडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ६४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून चोरून नेला म्हणून केळवा पोलीस ठाणे येथे दि.०१ ऑक्टों रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं.T ६५/२०२२ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केळवा परिसरातील वाढत्या चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या जनसंवाद अभियानामुळे वरील नमूद होण्यात प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज मधील एक आरोपी हा स्थानिक नागरिकांच्या परिचयाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने कौशल्य पूर्ण तांत्रिक तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपीकडून कसून चौकशी केली असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अ.क्र पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.व कलम
1 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ०१/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५४,४५७
2 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ०५/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५४
3 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T १३/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५७
4 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T १७/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५४
5 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ४५/२०२१ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४,४५७
6 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ५५/२०२१ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४,४५७
7 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ५९/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८०,४५४
8 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T १९/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५७
9 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T २९/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४,४५७
10 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ३५/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४
11 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ६५/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४
12 केळवा पोलीस ठाणे गु.र.नं.T ६६/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४
13 सफाळे पोलीस ठाणे गु.र.नं.T ८०/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४
14 सफाळे पोलीस ठाणे गु.र.नं.T ०८/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०,४५४,४५७
15 सफाळे पोलीस ठाणे गु.र.नं.T ४१/२०२२ भा.द.वि.सं.कलम३८०
या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पालघर मध्ये नवीन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आल्या पासून गुन्हेगारीला आळा बसवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्राईम सुद्धा कमी होताना दिसत आहे. बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्याचा कारभार स्वीकारल्यापासून उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत.तसेच अवैध धंद्यावर ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा हात आहे त्यांच्या मागे सुद्धा बाळासाहेब पाटील कारवाईचा उचल बांगडी करतील का? अशी चर्चा जनतेमध्ये होताना दिसत आहे. मागील पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे असताना पालघर जिल्हा हा मोकाट जनावरे सारखे धंदे चालताना दिसत होते.परंतु डॅशिंग अशी ओळख असलेले बाळासाहेब पाटील यांनी पालघर मध्ये येतात आपल्या कामाला चांगली सुरुवात केली आहे. अशा यांच्या कामाला आमचा सलाम आहे.
सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती नीता पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभूते पोलीस निरीक्षक स्थागुशा पालघर, सपोनी/ सतिष गवई, प्रभारी अधिकारी केळवा पोलीस ठाणे, पोउपनि/ सागर पाटील,स्थागुशा पालघर तसेच केव्हा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.