धनत्रयोदशीच्या (Dhanteras Gold rate) दिवशी अनेक जण सोनं खरेदी करतात. या सणाच्या दिवशी देशात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळेच वाढती मागणी पाहता दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोने 50,226 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. साप्ताहिक आधारावर सोनं 366 रुपयांनी महागलं. तर चांदी 57613 रुपये प्रति किलोवर बंद झाली. साप्ताहिक आधारावर चांदी प्रति किलो 2387 रुपयांनी वाढली.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा मेरी डेली यांनी सांगितले की, जगातील आक्रमक प्रवृत्तीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. आता व्याजदर वाढवण्याची भीती आहे. बाजाराचा ट्रेंड पाहिला तर 75 बेसिस पॉइंट्स आणि डिसेंबरमध्ये 50 बेसिस पॉइंट्सने वाढेल. मेरीच्या वक्तव्यानंतर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 31 डॉलरने वाढून 1657 डॉलर प्रति औंस आणि चांदी 0.82 डॉलरने वाढून 19.42 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.
24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate)
IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 5006 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 4886 रुपये, 20 कॅरेटची किंमत 4456 रुपये, 18 कॅरेटची किंमत 4055 रुपये आणि 14 कॅरेटची किंमत 3229 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे 999 शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 50,062 रुपये, 995 शुद्धतेचा दर 49,862 रुपये, 916 शुद्धतेचा दर 45,857 रुपये, 750 शुद्धतेचा दर 37,547 रुपये आणि 585 शुद्धतेचा दर 37,547 रुपये आहे. 999 टक्के शुद्धतेच्या चांदीची किंमत 55,555 रुपये प्रति किलो आहे.