मोरबी… झूलता पूल दुर्घटना
Part- 2
अत्यंत दुःखद आणि खेदजनक दुर्घटना घडली. 140 लोकांना जिव गमवावे लागले. तेवढेच लोक जख्मी आहेत.
तडकाफडकी पहाणी दौरे झाले ,तज्ञ पहाणी चे अहवाल ही आले, कोणत्य कंपनी कडे दुरूस्ती टेंडर होत,कोण तिकीटे वसुली करीत होते ,काय काय मटेरीयल वापरल वगैरे.
काही तासांनी मा. प्रधानमंत्री साहेब पहाणी साठी येणार हे समजताच , प्रशासन मात्र खडबडून जागे झाले, नेहमी प्रमाणे.
रस्ते खड्डे रहीत, रंगरंगोटी , आणि दवाखाना ईमारतीचे नशिबच पालटले …. लाखोंच्या घरात खर्च झाला , बेड,गाद्या, फर्निचर, रंगरंगोटी सगळ काही काया पालट. ( झूलता पूल पडल्या मुळे )
संपूर्ण देशाच्या मिडीया ने दोषी कोण आरोपी कोण , गुन्हा कोणावर दाखल होईल अश्या दिबेट च्या मैफिली दाखवल्या….
….मात्र कारवाई कोणावर झाली…
गेट किपर, तिकीटे विकणारा , सिक्युरिटी, वाचमन.
सायरस मिस्त्री दुर्घटना….
…….. मर्चडीस कंपनी चा सर्वे, सेव लाईफ,आर टी ओ, वाहन मैन्यफेक्चरर, वाहन चालक संघटना, रस्ते सुरक्षा तज्ञ, खासदार साहेब, निरनिराळे NGO……. दोषी…चालक.
……… आणि परत अपघात घडूनये म्हणून … पंचक्रोशीतील सरसकट सर्वच कट बंद.
म्हणजे मार गुढघ्यावर आणि मलमपट्टी डोक्यात.
???? मग जर या पूर्वी हे कट अपघाता चे मुख्य कारण आहे हे माहीत असूनही कट खुले का ठेवले …? ( अनहिता पंडोल अती वेगाने ….. आणि अपघात घडेल मग बंद करु )
चारोटी ग्रामपंचायत आणि इतर पंचायत यांनी 20160 साली सतत सहा निवेदन देऊन, प्राधिकरण कडे मागणी केली होती कि पर्यायी व्यवस्था करुन हे कट बंद करा. मात्र पत्राला उत्तर नाही मिळाले.
मग हे अचानक कट बंद करण्याचे काम सूर्या पुलावर कढड्या ला धडकून अपघात झाल्यावर लक्षात आले…?
NHAI वालो अब तो सुधर जाओ.