Palghar Nargrik

Breaking news

सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेली अमित गांधी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन…

प्रतिनिधी:- प्रतिक मयेकर

पालघर येथील सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेली अमित गांधी यांचे काल मंगळवारी रात्री राहत्या घरी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यामुळे पालघर येथे शोककळा पसरली आहे.

दरम्यान अमित हे पालघर मध्ये सेवाभावी व्यक्तिमत्व कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख अशी निर्माण केली होती. तसेच कोणाच्या ही सुखदुःखात नेहमी भाग घेत असत. त्यांनी स्वतःच्या टेम्पो मधून रेल्वेतील अपघात, घेऊन जाण्याकरिता स्मशानभूमी पर्यंत विनामूल्य सेवा देत होते.अश्या सेवाभावी व्यक्तिमत्व कार्यकर्ताला पालघर नागरिकच्या परिवाराकडून दिवंगत अमित गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पालघर मधील सुप्रसिध्द व्यवसायिक प्रताप गांधी हे मोठे व्यवसायिक म्हणून ओळख असलेले त्यानंतर त्यांच्या अनुषंगाने आपल्या वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून,अमित गांधी यांनी आपला व्यवसाय चालू करून आपला उदरनिर्वाह करीत होते. तसेच ते पालघर मध्ये आपल्या स्वतच्या स्व खर्चाने सेवा पुरवित होते. मंगळवारी रात्री अचानक अमित गांधी यांची प्रकृती बिघडली आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या निधनामुळे पालघर परिसरात शोककळा पसरली असून, पालघर येथे स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment