शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा बाजार मांडू नये (Balasaheb Thackeray), असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) शिंदे गटाला (Shinde Group) दिला आहे. (Maharashtra Politics) तर बाळासाहेबांचं स्मारक सरकारच्या ताब्यात घ्या, या प्रसाद लाड यांच्या मागणीचा ठाकरेंनी समाचार घेतलाय. ‘त्यांना संपूर्ण देशाचा ताबा हवा, तिथे स्मारकाचं काय?’…बाळासाहेबांचं स्मारक ताब्यात घ्या, मग बघू, असा इशाराच त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला दिला आहे. (Maharashtra Political News )
दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, असे स्पष्टकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र येणार, असे म्हणाले. (Uddhav Thackeray on Rahul Gandhi and BJP ) त्याचवेळी भाजपला इशारा दिला आहे. बाळासाहेबांचं स्मारक ताब्यात घ्या, मग पुढे काय होईल ते पाहा, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा इशारा दिला.
उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला इशारा
शिवसेनाप्रमुख (Balasaheb Thackeray) केवळ शिवसेनाप्रमुख नव्हते, त्यांच्यामध्ये विविध पैलू होते. आजचा हा स्मृतिदिन मला थोडासा वेगळा का वाटतोय? कारण, काहीजणांना शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर 10 वर्षे लागली. शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला. आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळ हा बाहेर आलेला आहे. लढता लढता बाळासाहेब जावून 10 वर्षे गेली. बाळासाहेबांची ही व्यंगचित्रे ही इतरांनी काढली आहेत. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा बाजार मांडू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. तर बाळासाहेबांचं स्मारक सरकारच्या ताब्यात घ्या, या प्रसाद लाड यांच्या मागणीचा ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. ‘त्यांना संपूर्ण देशाचा ताबा हवा, तिथे स्मारकाचं काय?’ बाळासाहेबांचं स्मारक ताब्यात घ्या, मग बघू, असा इशाराच त्यांनी भाजप आणि शिंदेंना दिला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, आमच्या मनात सावकरांविषयी प्रेम आहेच. स्वातंत्र्यलढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलू नये.
‘भाजपला देशाचाच ताबा हवाय’
शिवसेना प्रमुख बाळासाहेब याचे स्मारक हे प्रेरणा देणार असेल. भाजप सगळ्यांचाच ताबा घेत आहे. देशाचाच ताबा हवाय तर स्मारकाचे काय? पाचकळपणा बंद करावा. पहिल्यांदा त्यांचा राजकारणातील डीएनए तपासावा लागेल. मातृसंस्थेचे स्वातंत्र्यातील योगदान सांगावे. सावरकर यांना भारतरत्न का दिला नाही अजून, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला केला आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली होती. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी बोलले त्याच्याशी आपण सहमत नाही. दरम्यान आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर जाऊन स्मृतिस्थळास अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारपरिषदेत नाव न घेता शिंदे गटावर निशाणा साधला. या प्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई हेही उपस्थित होते.
राहुल गांधी यांची भाजपवर टीका, ‘सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन’
राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. देशातील दलित आणि आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप पक्ष दररोज संविधानावर हल्ला चढवत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा उल्लेख केला. इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासी समाजाचं प्रतिक आहेत, ते तुमच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.