Palghar Nargrik

Breaking news

अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा; दक्षिण मुंबई भेंडी बाजार येथे जोरदार आंदोलन…

मुंबई दि. २१ नोव्हेंबर – अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा… काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय… राज्यपाल हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत शिवसेना पदाधिकार्‍यांनी भेंडी बाजार येथे जोरदार आंदोलन केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आज दक्षिण मुंबई भेंडी बाजार येथे फैजुल्ला खान शरीफ देशमुख, मुख्तार पोपेरे यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुंबादेवी विभाग संघटक राजू तोडकर, समन्वयक शकील सिद्दिकी, शाखाप्रमुख दिलीप सावंत, उपशाखाप्रमुख हुसेन शेख, हुसेन शाह, मुजम्मिल मांडवी वाला, साजिद शेख, रहीम पटणी, फैयाज तांबोळी, शेख भाईजान, आयाज शेख, याकूब शेख, आणि शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Comment