Palghar Nargrik

Breaking news

जावेद लुलानीया यांचेवर झालेल्या गोळीबारास एक वर्ष उलटले तरीही पोलीसांना आरोपी पकडण्यात अपयश …..

पालघर- पालघर येथे दिनांक- 16 नोव्हेंबर 2021 च्या रात्री पालघर नागरीकचे संपादक जावेद मजिद लुलानीया यांचेवर रात्री 9.30 वाजता च्या दरम्यान मनोर रोड पालघर येथील त्यांचे मालकीचे दुकान ओवेझ चिकन शॉप समोर मोटार सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता.
गोळी लागून जावेद लुलानीया गंभीर जखमी झाले होते. त्यातुन ते नशीब बलवत्तर म्हणून बचावले होते. अज्ञात इसम मोटार सायकल वरून आले आणि गोळीबार करून निघून गेले. त्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज उपलब्ध असतानाही पोलीसांनी अद्याप पर्यंत आरोपी पकडले नाहीत. या घटनेला एक वर्ष उलटून गेले. परंतू पोलीसांनी आरोपी तर पकडले नाहीच उलट ज्यांना पकडले होते त्यांनाही पोलीसांनी क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आरोपी सापडत नाहीत म्हणून दिनांक 22/12/2022 च्या पत्राने ही केस समरी म्हणून सबंधित अनोळखी आरोपींचा शोध न लागल्यामुळे गुन्हा कायम स्वरूपी तपासावर ठेवण्यात आला असून तुर्त अ वर्गात समरी मागवून बंद करण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला आहे.


पोलीसांचा या प्रकरणी तपासच संशयित असून पकडलेल्या संशयित आरोपींना वाचविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा माझ्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. आता माझ्यावर या पेक्षा जीव घेणा हल्ला व्हावा व माझा जीव जावा याची वाट पोलीस पाहत आहेत का असा संतप्त प्रश्न जावेद लुलानीया उपस्थित करत आहेत.
वेळो-वेळी अवैध धंद्यांविरोधात बातम्या केल्याने माझा पोलीसांच्याच सहकार्याने गेम करण्याचा प्रयत्न होता का? या प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत.

म्हणजेच कुठेतरी पाणी मुरत आहे.

आरोपींना अटक न होण्या मागचे कारण तरी काय…?

जीव गेल्यावरच पोलीस आरोपींना अटक करणार का?

असा ही प्रश्न जावेद लुलानीया हे जाहिर रित्या पोलीस प्रशासनाला विचारत आहेत.

Leave a Comment