महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळणेकरिता ग्रामपंचायत कार्यालय मान यांच्याकडून नाहरकत दाखला दिल्याचा मोबदला म्हणून एका नाहरकत दाखल्याचे २५००० रुपये याप्रमाणे दोन नाहरकत दाखल्यांचे एकूण ५०,००० रुपये लाचेच्या रक्कमेची लाच घेणाऱ्या मान ग्रामपंचायतच्या सदस्याला व खाजगी (चालकाला) पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली.
बोईसर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळणेकरिता ग्रामपंचायत कार्यालय मान यांच्याकडून नाहरकत दाखला दिल्याचा मोबदला म्हणून दोन नाहरकत दाखल्यांचे एकूण ५०,००० रुपये लाचेच्या रक्कमेची लाच घेणाऱ्या मान ग्रामपंचायतच्या सदस्याला व खाजगी (चालकाला) पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ही कारवाई बुधवारी दुपारी ०१.१४ वाजण्याच्या सुमारास अजय बियर शॉप नं.२०४६, बोईसर चिल्हार रोड,वारांगडे, येथे करण्यात आले.अजय सुरेश शिणवार वय- २७ वर्षे, ग्रामपंचायत मान सदस्य,बोईसर, ता.पालघर,विक्रांत राजेंद्र चुरी, वय २९ वर्षे,व्यवसाय खाजगी-चालक, दोन्ही रा.वारांगडे आठलेपाडा, पो.बेटेगाव, बोईसर पूर्व ता.जि. पालघर,यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदस्य अजय सुरेश शिणवार व विक्रांत राजेंद्र चुरी यांनी ५० हजार रुपये स्वीकारले त्यावरून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पालघर लाचलुचपत विभागाने पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्वपन बिश्वास,पोहवा/ अमित चव्हाण,विलास भोये, संजय सुतार, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, योगेश धारणे, पोना/सखाराम दोडे, स्वाती तारवी, यांनी केली.