सलीम कुरेशी :
बेशिस्त वाहनचालकांकडून १लाख ५०हजार रुपये वसूल|
तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. १८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात.|
तलासरी दि.२६|- तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.१८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात. तलासरी तालुक्यातील काही प्रवाशी वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका आहे. तसेच काही चालकांकडे वाहन परवाना राहत नाही. तर काही चालक दारू पिऊन वाहने चालवितात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे होत नाही. ही बाब लक्षात घेऊन तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
शहरात विना परवाना दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे त्यामुळे तलासरी याठिकाणी कॉलेजच्या मुलांनी विना परवाना वाहने शहरात चालू नये,शहरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये व सर्व वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करत वाहने चालवावी असे आव्हान तलासरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अजय वसावे यांनी केले आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तलासरी शहरातील तलासरी-उधवा,तलासरी-संजाण, आमंगाव-संजाण,उपळाट-कोचाई रस्त्यावर सकाळी आणि दुपारी वेळेत विना हेल्मेट,विनापरवाना, ट्रिपल सीट बसून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आले.याबाबत तक्रारीनंतर तलासरी तालुक्यातील रस्त्यावर स्थानिक पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवून २९० दुचाकी वाहनांना तलासरी पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवण्यात आला व त्यांच्या कडून मोटार वाहन कायद्यानुसार १ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.