Palghar Nargrik

Breaking news

४८,५६,००० रुपयाचा बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई……

तलासरी दि.०१| खानवेल-उधवा परिसरात विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही दारू इन यु.टी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या क्रेंदशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरिता नेली जात होती. पकडण्यात आलेल्या एक टेम्पो मधून तब्बल ४८,५६,००० लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. याप्रकरणी वाहन चालक सुरेशकुमार दयाराम यादव, रा. जौनपूर उत्तर प्रदेश व शैलेश मोहनभाई वर्मा रा. उधवाडा, जि.वलसाड,गुजरात यांना बेड्या ठोकल्या आहेत.

इन यु.टी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या क्रेंदशासीत प्रदेशामध्ये बेकायदा दारू विक्री करण्यासाठी एक टेम्पो जाणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार, टेम्पो (एम.एच.४८.सी.बी-५४१९ यांना खानवेल-उधवा परिसरात परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून निरीक्षक आनंदा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उधवा पोलीस चौकीसमोर खानवेल-उधवा रोड येथे पाळत ठेवली असता पकडले. त्यानंतर टेम्पोची झडती घेतली. त्यामध्ये विदेशी मद्याचे ३३० बॉक्स व बियरचे ७० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एकूण ४०० बॉक्स, लाकडी भुशाच्या २०० गोण्या,दोन मोबाईल व एक वाहनासह ४८,५६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे,जवान सर्वश्री नारायण जानकर, केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे,नानासाहेब शिरसाठ,वैभव वामन व जी.के. खंडागळे यांनी पार पाडली तसेच पुढील तपास दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे करत आहेत.

Leave a Comment