Palghar Nargrik

Breaking news

टेम्पो चोरांची टोळी अटकेत,४ करोड ७५ लाख रु.किंमतीचे ५३ वाहने जप्त….

मिरा-भाईंदर दि.०२| मिरा-भाईंदर काशिमीरा (मिरा रोड) परिसरात गेल्या काही दिवसांपासुन वाहन चोरटयांनी उच्छांद मांडला होता. वेगवेगळया ठिकाणावरुन अनेक वाहन चोरुन नेलेली होती. या वाहन चोरटयाविरुध अखेर मोहिम उघडत वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद करत त्यांच्याकडुन ४८ आयशर टेम्पो,०२ टाटा टेम्पो,०१ अशोक लेलँण्ड टेम्पोसहीत सुमारे ०२ क्रेटा कार असा एकुण सुमारे ४ करोड ७५ लाखांचा मुद्येमाल जप्त करून महाराष्ट्र, हरियाना,उत्तरप्रदेश, दिल्ली, राज्यांतील २२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

वाढत्या वाहन चोरीच्या विरोध्दांत पोलीस उप आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे,सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि.अविराज कुराडे,स.पो.नि.कैलास टोकले,पुष्पराज सुर्वे,सुहास कांबळे, स.फौ.राजु तांबे,संदीप शिंदे,किशोर वाडीले,संजय पाटील,संतोष चव्हाण, पोहवा/अविनाश गर्जे,संजय शिंदे,संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा,सचिन सांवत, प्रफुल पाटील, विकास राजपूत, समीर यादव, पोअंम. प्रशांत विसपुते,सनी सूर्यवंशी (१) चौपानकी पो.ठाणे राजस्थान,(२) एस.ओ.जी.राजस्थान (३) पेथापुर पो.ठाणे गांधीनगर (४) गुन्हे शाखा,अहमदाबाद गुजरात त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापेमारी करत या चोऱ्यांच्या छडा लावला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी (१) फारुख तैय्यब खान (वय,३६ ) व्यवसाय चालक, रा.फाखरूद्दीनका पो.टपुग्रा, ता .टिजारा, जि. अलवार,राजस्थान (२) मुबिन हारिस खान,(वय ४०) व्यवसाय चालक,रा.फाखरूद्दीनका पो.टपुग्रा, ता .टिजारा, जि. अलवार,राजस्थान यांच्याकडुन अवजड वाहने (ट्रक/ टेम्पो) सुमारे ५३ आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांना अटक करून ४ करोड ७५ लाख रु. किंमतीचे वाहने जप्त करण्यात आल्या.या चोरी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र ९०२/२०२२ भादंविसक ३७९ सह प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Leave a Comment