Palghar Nargrik

Breaking news

आमदार निकोले यांच्या पाठपुरावाने उड्डाणपूल मंजूर ; ग्रामस्थांना सुख सुविधा मिळणार*

डहाणू. (प्रतिनिधी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या पाठपुरावाने उड्डाणपूल मंजूर झाले असून लवकरच ग्रामस्थांना सुख सुविधा मिळणार आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, कैनाड, सरवली, वाकी येथून जाणाऱ्या रेल्वे फ्रेट कॉरिडोर दरम्यान कैनाड रस्त्यावर कोसबाड – बोर्डी दरम्यान उड्डाणपूल हा या कामाच्या आराखड्यात नव्हता. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येतातच येथील नागरिकांनी आमचे किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आमचे कार्यकर्ते घेऊन ग्रामस्थांच्या हितासाठी रेल्वे फ्रेट कॉरिडोर चालू काम बंद पाडून उक्त उड्डाणपुलाची पुलाची मागणी केली. दरम्यान आमदार निकोले यांनी संबंधित ठेकेदारासोबत बैठक घेतली आणि हा उड्डाणपूल होणे ग्रामस्थांच्या हिताचे आहे असे त्यांच्या लक्षात आणून दिले, परंतु हा विषय ठेकेदाराच्या हद्दीत नसल्याने आ. निकोले यांनी आपल्या पत्रावर थेट भारतीय रेल्वे कडे जोरदार मागणी केली असता त्यावर कार्यवाही होऊन सदरहू उड्डाणपूल मंजूर झाले

असून त्या कामाचे उद्घाटन आ. निकोले यांनी केले.

याप्रसंगी माकप आमदार विनोद निकोले, किसान सभा कार्यध्याक्ष कॉ. चंद्रकांत घोरखना, कैनाड ग्रामपंचायत सरपंच कॉ. नुतन चिपात, सरावली ग्रामपंचायत सरपंच देवराम दळवी, सदस्य केशव दळवी, कॉ.राजेश दळवी, कॉ.आदित्य अहिरे, कॉ. कमलेश राबड, कॉ.शैलेश कुवरा, तसेच रेल्वेचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment