दारू पिताना झालेल्या वादातून पोटावर डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून खून करण्यात आल्याची घटना निकावली सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मागे स्मशानभूमी येथील शेडमध्ये परिसरात घडली
कासा.दि.०९| दारू पिताना झालेल्या वादातून पोटावर डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून खून करण्यात आल्याची घटना कासा परिसरात घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.शिवराज देविदास खारतोडे (वय.२३,रा.मु. पवारवाडी,ता. फलटण,जि.सातारा)असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी (वय.४०,रा.मु. पवारवाडी,ता. फलटण,जि.सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
सय्यदची रोहित पांडुरंग हजारे (वय.२२,रा.मु. पवारवाडी,ता. फलटण,जि.सातारा) याबाबत कासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हे आरोपीत एकच गावचे रहिवासी असून, ते मजुरीचे कामासाठी मौजे निकावली येथे दुपारी ०५.३० वाजता सु.मौजे निकावली गावाचे हद्दीत सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मागे स्मशानभूमी येथील शेडमध्ये सोबत बसून दारू पित असताना यातील मयत व आरोपीत यांचेत झालेल्या भांडणावरून आरोपीत याने शिवराज यांचे पोटावर डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून खून करण्यात आले.म्हणून कासा पोलीस ठाणे येथील गुन्हा. रजि.नं.T४७/२०२३ भादंविसक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.