बोईसर विशेष बातमी:- जिल्ह्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती समुद्रावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर तालुक्यातील बोईसर-नवापूर रेती बंदरांमधून अधिकृतपणे रेती उत्खनन करण्यास परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उपसा केला जात असून पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच त्यांच्यातील काहींचा या अनधिकृत रेती उपशाला आशीर्वाद असल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे.
नवापूर याठिकाणी महसूल विभागाने सुट्टीच्या वेळी धाड टाकून एक टेम्पो व ९ बोटी हस्तगत करण्यात आल्या होत्या.त्या मधील एक बोट महसूल खात्याच्या पोटात गेल्याची माहिती सुत्रा कडून प्राप्त झाल्याची चर्चा होत आहे. महसूल विभागाने कारवाई करताना सुध्दा वरखाली कारवाई करण्यात येत होती. धाड रात्री ०८.०० वाजता मारून कारवाई रात्रीचे ०१.०० वाजले तरी कारवाई करण्यात आली नव्हती.अशी सुध्दा माहिती मिळाली आहे.ज्यांनी चोरटा रेती उपसा रोखायचा, अशा चोरांवर कडक कारवाई करायची त्यांना दररोज लक्ष्मीदर्शन घडत असल्याने बेसुमार रेती उपसा होत असून त्याकडे सर्वांचीच डोळेझाक झाली आहे. ही सर्व परिस्थिती माहीत असूनही कुणीही काहीही बोलायला तयार नसल्याने दररोज अनधिकृतपणे रेतीच्या गाड्या-बोटी अंधारात चोरीची रेती घेऊन जात आहेत.
वर्षभर रेती उपशाला परवानगी नसल्याने अनधिकृत रेती उपशाचा मुद्दा सतत चर्चेत राहिला. रेती उत्खनन करण्यास अधिकृत परवानगी नसली तरी बांधकामे सुरूच होती. याचा अर्थच चोरीची रेती प्रचंड प्रमाणात निघाली.महसूल प्रशासनाने किरकोळ कारवाई केली असली तरी हव्या त्या प्रमाणात कारवाई झालेली नाही. अधुनमधून एखादी दिखाऊ कारवाई केली जाते. एरव्ही रेती चोरांना मोकळे रान असते. रेती उपसा करायचा त्यानंतर रेती वाहतूक करताना मार्गात येणाऱ्यांना त्यांचे हिस्से द्यायचे व रेतीची गाडी पुढे न्यायची अशी पद्धतच सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी रेती चोरी रोखायची अशी काही मंडळी मालामाल झाल्याची उघड चर्चा आहे. बोईसरजवळील नवापूर,दांडी,मुरबे व इतर बंदरातून रेती काढली जाते. रोज पहाटे ४ ते ६ यावेळेत रेतीच्या गाड्या चोरून पुढे जातात.रेती बंदरातून रेती घेतल्यानंतर पुढे रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक पोलिस चौकीत ‘खास’ कामासाठी थांबून ‘अर्थ’पूर्ण चर्चा केल्यानंतर रेतीचे ट्रक पुढे जातात. वाहतूक पोलिस ट्रकवर कारवाईसाठी नव्हे तर रेतीचे ट्रक सुरळीत पुढे जातात की, नाही हे पाहण्यासाठी जणू उभे असतात असे चित्र असते.
रेतीचा ट्रक/टेम्पो चालक रस्त्यात अडवेल त्याला हातमिळवणी करून पुढे जातो. एका ठिकाणी रेती ट्रक/टेम्पो चालकांना दोन हजार रूपये द्यावे लागतात, अशी माहिती एका ट्रक/टेम्पो चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. रेती चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाचे एक स्क्वॉड असले तरी तलाठी, मंडळ अधिकारीही कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. गाड्या जात असताना एखादी पकडली तरीही चहापानासाठी एकत्र येऊन मग समझोता होतो. दाखविण्यासाठी काही ठिकाणी कारवाई केली जाते. मात्र नाममात्र आहे. रेती घेऊन जाण्यात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
दोन्ही खात्यातील अधिकारी-कर्मचारी एकमेकांवर कारवाईची जबाबदारी ढकलून मोकळे होत असले तरी आपापली ‘अर्थ’खाती सगळेच कसे सांभाळतात याची चर्चा रेती उत्पादक व परिसरातील लोकांमध्ये सविस्तर होत आहे. आमचे ट्रक/टेम्पो असल्याने आम्हाला चोरीची रेती घेऊन धंदा करण्याशिवाय पर्याय नाही. रेती काढायची,ट्रक/टेम्पो पुढे घेऊन जाण्यासाठी मध्ये येणाऱ्या सर्वांना खुश करायचे यात पाच-सहा हजार रूपये द्यावे लागतात. त्यामुळे परिणामी रेती महाग विकली जाते. रेतीचे दर वाढल्याने बांधकामाचे दरही वाढल्याचे काही ट्रक/टेम्पो चालकांनी सांगितले. इतक्या प्रचंड प्रमाणात रेती काढली जात असताना रेती चोरीचे तुरळक गुन्हे दाखल होतात. चोरीच्या रेतीचे ट्रक/टेम्पो पकडताच गुन्हा दाखल न करण्यासाठीही तडजोडी होतात,असे सूत्रांनी सांगितले.
कोट
नवापूर या ठिकाणी एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या त्यामध्ये चार रेतीने भरलेले बोटी तर चार खाली बोटी सापडल्या तसेच MH.४८.T.४०४७ टेम्पो रेतीने भरलेला सापडला.जर त्यांनी दंड भरला तर गुन्हा दाखल करणार नाही.असे सांगण्यात आले.
(अनिल वायल सर्कल)
कोट
नवापूर येथे झालेल्या कारवाई मध्ये ९ बोटी हस्तगत करण्यात आले होते. परंतु कारवाई करताना महसूल अधिकारी टाळाटाळ करतात दिसत होते. त्यांच्या डोळ्याच्या समोर आधी ७ बोटी पळवण्यात आले होते.परंतु सातपाटी पोलीस स्टेशनचे पीआय यांच्यामुळे परत बोटी मागवण्यात आले.
(नवापूर ग्रामस्थ)
Ramzan special Limited stock. kurta pajama original material is available Gul Ahmed MTJ brand unstitched fabric is available… ???? Contact number and you can WhatsApp message us on 9967456836
Ramzan special readymade kurta pajama is available and Gul Ahmed mtj brand unstitched fabric is available… ???? Contact number and you can WhatsApp message us on 9967456836