प्रतिक मयेकर:
धावत्या लोकलमध्ये दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारत त्याच्या हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला पालघर रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. जिज्ञेश मनोज संखे वय.२५ रा.मु.पो.रामजी नगर, कुंभावळी,बोईसर ता. जि.पालघर असं या चोरट्याचे नाव आहे.झट पट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विरुद्ध सविस्तर तक्रार दिल्याने आरोपीस अटक करून पालघर रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.८५/२०२३ कलम ३९२ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपी हा बोईसर पोलीस ठाणे येथील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे नोंद आहेत.तरी आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन अधिक तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त सो.लोहमार्ग मुंबई, रविंद्र शिसवे, मा.पोलीस उपआयुक्त सो.संदीप भाजीभाकरे,व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त सो.वसई व विभाग,लोहमार्ग मुंबई बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी, पोनि/नरेन रणधीर,सपोफौ/मोरे,पोना/ विशाल गोळे,राहुल भोईटे पोशि/ अजय शेंडगे,अतुल कुटे,शरणबसप्पा धमदे, वैभव पाडळे शाम भोईर यांनी केली आहे