|प्रशासनाचा मनोर इन्न हॉटेल वर सोन्याचा वाटा |
मनोर 😐
नांदगाव तर्फे मनोर येथील सर्व्हे नं.७२ मधील १० ते १२ गुंठ्यात बांधण्यात आलेल्या सियाब पटेल हे चालवीत असलेले हॉटेल मनोर इन्न यामध्ये कोणती कायदेशीर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करीत असल्यामुळे महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेला मनोर इन्न हॉटेल जवळ बेकायदेशीर हॉटेल चालवताना दिसत आहे.परंतु याकडे महसूल विभागाने चहा पाणी घेतली आहे का? अशी खमंग चर्चा होताना दिसत आहे.कारण माहित असून सुद्धा याकडे कानाडोळा करताना आढळत आहे. गरिबांचे हॉटेल तोडताना महसूल खाता पुढे असतो तर माजलेले हॉटेल मालकांवर महसूल का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.सदर जागेच्या व्यवहारात सुध्दा वर खाली व्यवहार झाल्याचा दिसून येत आहे. ह्या ठिकाणची जागा आदिवासी खातेदार सुदाम बारक्या धापशी व सियाब अखलाक पटेल ह्यांनी (१)ठकु दुद्या जाधव (२) मंजुळा कान्हा मानकर (३)प्रवीण कान्हा मानकर (४) प्रकाश कान्हा मानकर (५) सुंदर रामू साबळा (६) तारा सुनील वांगडा (७) कृष्णा कान्हा मानकर ह्या कडून नोटरी कराराने तथाकथित विकत घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु या व्यवहाराला खरेदीखताचे नाव दिलेले असून दि.२४/११/२०१२ रोजी नोटरी केलेल्या असून आज पर्यंत
मिळकत विकत घेतल्या बाबत मूळ मालकाशी काहीही कागदोपत्री व्यवहार केलेला नाही.महामार्गावर ७४ गुंठे जागा केवळ सहा लाख इतक्या कमी किंमतीस विकत देण्याबाबत मजकूर आहे.परंतु त्यापैकी एक लाख पन्नास हजार इतकी रक्कम चेक ने दिल्याबाबत उल्लेख आहे.
यामध्ये विक्री परवानगी न आणता शासनाचा कर बुडविण्याकरिता ७५% दंड न भरता तथाकथित खरेदीखत केलेले आहे.तसेच मनोर इन्न हॉटेल महामार्ग लगत असल्यामुळे महामार्गाची रीतसर परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही
हॉटेलमध्ये बेकायदेशीर अवैध दारू विक्री जोमात सुरू असून अशा दारू विक्रीला आशीर्वाद नेमका कोणाचा आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे स्थानिक पोलिसांची उदासीनता आणि राज्य उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर अवैध दारू विक्रीत सर्रास वाढ होत आहे. महामार्गावरील मनोर इन्न हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू सहज मिळत असल्याने हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो.