|बोईसर शहरात एक दिवस आड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.|
बोईसर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बोईसरच्या ओसवाल या भागात तीन तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
बोईसर शहरात कोयता गँगची दहशत काही केल्या थांबत नाहीए, आता तर त्यांना पोलिसांचीही भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उभा निर्माण झालाय. भैयापाडा आणि यशवंत सृष्टी भागातील रेहान शेख आणि संजीत मिश्रा या दोन तरुणांवर रविवारी रात्री १०.३० नंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्यांना घेराव घालून मारहाण करण्यास सुरुवात केली होती. टोळक्याने रेहानच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि संजीतला क्रिकेटची बॅटच्या बेदम मारहाण केल्यानंतर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री कोयता गँगने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला.जुन्या भांडणात राग मनात धरून कोयता गँगने शम्बु भाजीवाला यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला.व हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले बोईसर परिसरातील ओसवाल समोर हा धक्कादायक प्रकार घडला. जखमी झालेल्या व्यक्तीचं कोयता गँगच्या काही आरोपींबरोबर आठ महिन्यांपूर्वी त्यांचा किरकोळ वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरत कोयत्या गँगच्या दोघांनी तरुणांवर कोयत्याने वार केले.
बोईसर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी प्रवीण पुरोहित व कारचालक आकाश सिंग याला बोईसर पोलिसांनी रात्री अटक केले आहे.