डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.
परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. या आलेल्या चिखलामुळे काही वाहने परशुराम घाटात मातीत अनेक वाहने रुतली होती. मात्र आता पाऊस थांबला असून माती बाजूला करण्याचं काम सुरु आहे.