शिवेसनेनं (Shivsena) दिेलेल्या वादग्रस्त जाहिरातींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखेर मौन सोडलं. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, आम्ही 25 वर्षं एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे असं म्हणत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला. तर दुसरीकडे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. फडणवीस आणि माझी मैत्री खूप जुनी आहे, ये फेविकॉल का जोड है, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी देखील सगळं आलबेल आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
जाहिरात वादावर पडदा (Maharashtra News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरमध्ये दाखल झाले. शासन आपल्या दारी या योजनेबाबत पालघरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, शिंदे आणि माझा प्रवास हा 25 वर्षांचा असून आम्ही दोघेही गेल्या 25 वर्षांपासून एकत्र काम करतोय पण गेल्या वर्षभरात आमचे नाते घट्ट झाले आहे, आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षांपासून आहे. पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करणार आहे. महात्मा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत सामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. कुठल्या जाहिरातीमुळे किंवा कुणी काही बोललं म्हणून काही तरी होईल एवढं तकलादू आपलं सरकार नाही. जोपर्यंत सामान्य जनतेचे काम होणार नाही तोपर्यंत हे सरकार काम करत राहणार आहे.
मागचे सरकार घरी आणि आत्ताचे सरकार आपल्या दारी (Shasan Aplya Dari)
उद्धव ठाकरे हे घरातून बाहेर न पडल्याने राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. राज्यात करोनाचं महासंकट असतानाही ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. त्यावरून विरोधक आजही कायम टीका करतात. हाच मुद्दा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज ठाकरेंना टोला मारला आहे. “मागचे सरकार आपल्याला घरी बसलेले पाहायला मिळाले. मात्र आत्ताचे सरकार आपल्या दारी आहे. मागचं सरकार घरी बसले होते. वर्षभरापूर्वी सरकार बदललं या दोन सरकारमधील फरक दिसतो. शासन आपल्या दारी या उपक्रमातून अनेक योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सरकार करत आहे.