Palghar Nargrik

Breaking news

बोईसर बसमधील पाणी गळतीने प्रवासी त्रस्त; प्रवाशांची गैरसोय….

बोईसर| राज्य परिवहन महामंडळाच्या बोईसर आगाराला कोणी नव्या, चांगल्या सुस्थितीतल्या बस देता का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास असे सांगत बसने प्रवास करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत प्रवासी बस मधून प्रवास करीत आहेत.महिलांना पन्नास टक्के सूट मिळाल्याने महिलांची संख्या वाढली, बसचे उत्पन्न ही वाढले, मात्र बस प्रवासी घेऊन जाण्यासाठी सुस्थितीत नाहीत. बसच्या खिडक्यांच्या काही काचा गायब, काही काचांचे व खिडक्यांचे रबर पॅकिंगच नसल्याने प्रचंड कर्कश आवाजाने प्रवाशांना डोकेदुखी होते, पावसाळ्यात पाणी ही गळायला लागल्याने प्रवासी वैतागले आहे.बस लांब पल्ल्याच्या असोत की ग्रामीणच्या फेऱ्या करणाऱ्या बस सर्वच सारख्या असल्याची स्थिती आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी असे बिरुद मिरविणारे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बोईसर आगाराची बोईसर-नवापूर-मुरबे बस (एमएच २० बीएल ०८८७) बोईसर बसस्थानकातून दुपारी ०३.०० वाजता नेहमीप्रमाणे निघाली.बोईसरहून नवापूर प्रवासादरम्यान बसच्या खिडक्यांचा कर्कश आवाज, काही खिडकीच्या काचा तुटलेल्या या स्थितीत असलेल्या बसने लांब पल्ल्याचा प्रवास प्रवासी नाइलाजाने करत होते, त्यात पावसाला सुरवात झाल्यानंतर बसमध्ये गळती सुरु झाली.पाणी गळायला लागल्याने प्रवाशांना बसायला, उभे राहायला जागा नव्हती. बसल्या जागेवर पाणी गळत असल्याने सीट वरून उठून उभे राहिले तर त्या जागेवर ही पाणी गळत होते. यामुळे प्रवाशांचे हाल झाले

Leave a Comment