Palghar Nargrik

Breaking news

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळ्यामुळं वाहनांचा खोळंबा; पाहा सध्याच्या घडीला नेमकी काय परिस्थिती…….

पावसाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळल्याचं आपण पाहिलं. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरीही काही तासांसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनं वाहतुक करणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.

मुंबई- पुणे- एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याजवळच दरड कोसळली. परिणामी पुणे- मुंबई मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा यावेळी खोळंबा झाला. सुदैवानं दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कुठलंही वाहन सापडलेलं नसून आता दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

लोणावळ्याजवळील मार्गावर असणारी दरड हटवण्यात आल्याचं यंत्रणांकडून सांगण्यात आलं. असं असलं तरीही सकाळच्या वेळीसुद्धा मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहनंही थांबवली जात आहेत. सध्या दरड हटवण्यासाठी यंत्रणां वेगानं प्रयत्न करत असून, काही वेळातच हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

 

वाहतूक सुरळीत
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोळंबलेली वाहतूक आता सुरळीत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक रात्री 2 वाजेपर्यंत ठप्प झाली होती. आडोशी बोगद्याजवळ जवळपास 25 डंपर भरेल इतका मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. आयआरबी यंत्रणा, बोरघाट पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने ढिगारा बाजूला केला गेला.

Leave a Comment