पालघर – दि. २६, मणिपूर मधील विदारक व राक्षसीवृत्तीचे काही दृश्य समाजमाध्यमांद्वारे जगा समोर आली आहेत.
त्यामुळे सर्वत्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, या तिरस्करणीय घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने कडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आले.
दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी ही घटना असून, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणेकामी पंतप्रधान महोदयांनी आणि गृहमंत्र्यांनी आता तरी ह्या विषयात लक्ष घाला असे विनंतीवजा पत्र राज ठाकरे यांनी लिहिले होते. पण परिस्थिती जैसे थे आहे. हेच तर दुर्दैव आहे. यामुळे मणिपूर वाचलं पाहिजे. तेथील जीवघेणे अत्याचार थांबले पाहिजेत या अपेक्षेत मणिपूरमधील निंदनीय घटनेचा जाहीर निषेध नोंदवित, याकामी राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घातले पाहिजे अशा प्रकारचे निवेदन पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून आज पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रिती मोरे, जिल्हा उपाध्यक्षा तथा सातपाटी सरपंच सिमा भोईर, उपतालुका अध्यक्षा सारिका मोरे, विभाग अध्यक्षा राजश्री ठाकूर, अश्विनी पाटील, हर्षदा म्हात्रे, तसेच जिल्हा सचिव दिनेश गवई, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश म्हात्रे, तालुका अध्यक्ष तथा केळवा सरपंच संदीप किणी, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश उपचिटणीस सिद्धेश महाले, सातपाटी उपसरपंच अभिजित तरे, सातपाटी सदस्य रितेश पागधरे, नितीन पाटील, नांदगाव उपशाखा अध्यक्षा रश्मी नाईक इत्यादी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.