पालघर | सलीम कुरेशी
पालघर शहराच्या आरोग्य व्यवस्थेला कोणीच वाली राहिलेला नसून, पालघर नगरपरिषदेचे स्वतःचे असे एकही रुग्णालय पालघर शहरात नाही,पालघर शहरातील पूर्वे कडील घोलविरा भागातील राहणाऱ्या सोनाली विष्णू धामोडा वय २८ या तरुणीला रात्री सर्प दंश झाला होता.सर्प दंश झाल्यावर रात्री दिड वाजता तरुणीला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तिथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सेविकेने उपलब्ध शिकाऊ वैद्यकीय अधिकारी यांना सांगितल्यावर त्यांनी केसपेपर बनवून तरुणीस रुग्णालयात भरती करून घेतले होते. आणि ते तेथून निघून गेले.उपस्थित आरोग्य सेविकेने त्या वेळी इंजेकशन देऊन तरुणीवर उपचार केले, त्या नंतर सकाळी साडे सहा वाजता तरुणीची तब्येत जास्तीच बिघडल्यावर तरुणीच्या भावाला आरोग्य सेविकेने फोन करून तरुणीला आय सी यु मध्ये भरती करायला लागेल,तुम्ही यांना दुसऱ्या रुग्णालयात हवायला सांगितले,त्या नंतर ट्रान्सफर पेपर बनवायला एक तास लावून नंतर रुग्णावाहीका गुजरातच्या दिशेने रवाना केली. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उपचारासाठी उशीर आणि आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप केला आहे.
ठळक /-
पालघर ग्रामीण रुग्णालयात बहुतांश रुग्णांना उपचार वेळेवर मिळत नसल्याचा आणि रुग्णालय कर्मचारी रुग्णांनच्या नातेवाईकांन सोबत उद्धट पणे वागत असल्याचा आरोप होत आहे.तसेच नविन शिकाऊ डॉक्टर यांच्या सोबत प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने वेळेवर रुग्णाच्या उपचारा बाबत निर्णय घेऊ शकत नाहीत.
चौकट १ /-
रात्रीच्या वेळी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांना खाजगी रुग्णालयात पाठवून रुग्णांना आर्थिक भुर्दंड देण्यात येत असून खाजगी रुग्णालया कडून येथील डॉक्टर कमिशन घेत असल्याचा आरोपही रुग्णांच्या नातेवाईकांन कडून येथील डॉक्टरांनवर करण्यात येत आहे.
चौकट २/-
पालघर नगरपरिषदेचे स्वतःचे कार्यालय तर नाहीच, पण जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नगरपरिषदेचे स्वतःचे रुग्णालय देखील नाही. नगरपरिषद स्थापन होऊन आता २४ वर्षे पूर्ण होत आले असूनही पेसा जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेचे हे हाल आहेत. नगराध्यक्ष आणि सभापती आणि नगरसेवक यांना फक्त फोटो सेशन करायला आवडते पण प्रत्यक्ष काम करायला ते दूरदूर पर्यंत कुठेही दिसत नाहीत.
कोट /-
माझ्या बहिणीला जर ह्या हॉस्पिटल मध्ये उपचार करू शकत नव्हते तर, आम्हाला रात्रीच सांगायचे होते. आम्ही रात्रीच दुसऱ्या हॉस्पिटलला हलवले असते. डॉक्टरांनी आम्हाला सकाळी सांगून माझ्या बहिणीचा जीव घेतला आहे. या दोषी डॉक्टरांवर कारवाई व्हायला पाहिजे.
–निलेश कमलाकर धामोडा, मृत तरुणीचा भाऊ.
कोट /-
२ महिन्यापासून रुग्णाची टीबी ची ट्रीटमेंट सुरु होती.तसेच मणियार साप चावल्याने रुग्णच्या शरीरावर व्रण नव्हते,आणि कुटुंबियांनी साप चावल्याचा संशय व्यक्त केला त्या मुळे ट्रीटमेंट द्यायला उशीर झाला.रुग्णा ला आम्ही रात्री वाचविण्याची शर्थीचे प्रयत्न केले असून त्या साठी आम्ही रुग्णाला १७ इंजेकशन दिले आहेत.मी मान्य करते की माझे डॉक्टर नविन आहेत, त्यांनी मला कळवायला हवे होते. ती त्यांची चूक आहे.पण त्यांनी आपल्या परीने शर्थिचे प्रयत्न केले आहेत.
–डॉ.दिप्ती गायकवाड, अधीक्षक, पालघर ग्रामीण रुग्णालय.