ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. दरम्यान, यामध्ये मृत झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील शहापूर इथं झालेली भीषण दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांनी श्रध्दांजली अर्पण केली. अपघातातील जखमींना लवकर आराम मिळावा ही प्राथर्ना. घटनास्थळी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन काम करत आहे. बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व शक्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सध्या NDRF च्या वतीनं बचावकार्य सुरुच आहे. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुर्घटनेतील कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी : देवेंद्र फडणवीस
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ajit Pawar : दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी : अजित पवार
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
Supriya Sule : अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद
Supriya Sule : शहापूर, ठाणे येथे गर्डर कोसळून मोठी जिवितहानी झाली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.