बोईसर| शहरात ओसवाल ठिकाणी टाकण्यात आलेले बेकायदेशीर गतिरोधक अपघातांना रोखण्यासाठी टाकण्यात आलेले आहेत. मात्र हेच गतिरोधक अपघातांना नीमंत्रण देत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजारांनी बोईसरकर त्रस्त होत असून पाठ, मान, मणक्याचे आजार गंभीर होत असतांनाही बोईसर ग्रामपंचायत तसेच प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. दररोज गतिरोधकाच्या त्रासामुळे दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे.
बेकायदेशीररित्या टाकण्यात आलेले हे गतिरोधक कायद्याला धरून नाहीत. शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली करीत हे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आजाराला मोठ्या प्रमाणावर निंमत्रण दिले जात आहे. हे गंभीर आजार अनेकांच्या आयुष्य कमी करीत आहेत. दहा मीटरच्या अंतरावर एक गतीरोधक ओसवाल रोडवर प्रत्येक दहा मीटरच्या अंतरावर एक गतिरोधक आहे. टाकण्यात आलेले गतिरोधक मोठे व अशास्त्रीय पध्दतीचे असल्याने त्याचा त्रास थेट वाहनधारकांच्या शरीरावर होत आहे. अनेक वाहनधारकांना या गतिरोधकामुळे पाठ व मान दुखीचा तसेच गरोधर महिलांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.वाहन खराब होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.त्यामुळे बेकायदेशीर टाकण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे वाहनांचे शॉकअप खराब होणे, रिंग आऊट होणे या समस्या मोंठ्या प्रमाणात वाढल्या आहेत
त्यामुळे गॅरेजवर वाहने जाण्याचे प्रमाण अधिक होत आहे. स्पीड ब्रेकरवर मोठी वाहने जोरात आदळल्यास छोट्या कारच्या इंजीनला देखील त्यांचा झटका बसतो. एवढेच नव्हे तर इंजीनला धक्का लागल्यास वाहने थेट गॅरेजवरच न्यावी लागतात. गरज नसलेल्या ठिकाणी नको त्या पध्दतीने टाकण्यात आलेल्या या गतिरोधक टाकण्यात आले आहे. गतिरोधकावर वाहन आदळल्यामुळे मानेच्या मणक्याबरोबर पाठीच्या नाजूक भागास त्रास होतो. दणका बसला की, या भागातील मज्जारज्जू दुखावला जाऊन पाठदुखी, मानदुखीच्या समस्या वाढत असल्याचा दिसून येत आहेत.