दि. 02 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 15 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता हि सेवा अभियान आहे. याच कालावधीत दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तारीख एक घंटा स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी आवाहन केले आहे.
त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्र किनारा येथे आयोजन करून सकाळी 10 ते 11.00 या एक तासाच्या कालावधीत श्रमदान केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाज कल्याण समिती सभापती मनिषा निमकर , पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोल्हेकर, महिला व बाल कल्याण विभाचे उपमुख्य कार्यकारी प्रविण भावसार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर , पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नरेद्र रेवंडकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अगंणवाडी सेविका, बचत गट महिला, आरोग्य सेविका हे सामाजिक संस्था कार्यक्रमाचे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.