पालघर तालुक्यातील कुडण येथे लहानग्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार काल घडला असून वनविभागाचे कर्मचारी या भागात बिबट्याचा शोध घेत आहेत. कुडण दस्तुरी पाडा येथील प्रेम जितेंद्र पाटील या लहान मुलावर खेळत बाहेर असताना, बिबट्याने हल्ला केला आहे.
प्रेम हा बाहेर एकटाच खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. या बाबत वनविभागाचे कर्मचारी या भागात बिबट्याचा शोध घेत असून,हल्ल्यात जखमी लहानग्याला सेलवास येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.