कामाचा उडाला बोजवारा नगरसेवक झाले ठेकेदार…..
पालघर | नगरपरिषद बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पालघर नागरिकांना सोसावा लागत आहे. नगरपरिषदेतील काही नगरसेवक अनाथ असलेल्या मजूर संस्थेच्या नावावर कामे घेऊन स्वतः कामे करत आहेत, तर अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या नेत्यांचा धाक दाखवून बिले काढत आहेत. यामुळे नक्की पालघर च्या नागरिकांना कोणी वाली नाही का .? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ते होताना दिसत नाही. मुख्याधिकारी हे एवढे व्यस्त आहेत की त्यांना माध्यम प्रतिनिधीनचा फोन उचलायला वेळ मिळत नाही, तर ठेकेदार आणि काही ठराविक नगरसेवक बिले काढण्यात आणि स्वतःची घरे भरण्यात व्यस्त आहेत. ज्यामुळे नवीन काँक्रीट रस्त्यांची, गटारांचा बांधकामाचा दर्जा पूर्णपणे निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदेतील हद्दीतील खानपाडा येथे ५६ लाख रुपयाचे गटाराचे काम गेल्या वर्षभरा पासून मंजूर असून सुद्धा,ठेकदर व विकासक यांच्या हात मिळवणी मुळे विकासकचा फायदा कसं होईल याकडे लक्ष केंद्रित करत मंजूर कामाचे ठिकाण बदलल्यामुळे दिवाळीच्या पंधरा दिवसापासून खोदकाम करून ठेवलेल्या गटारामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. काही नागरिकांची दुचाकी तसेच चार चाकी या खोदलेल्या खड्ड्यात पडून मोठे नुकसान झाल्याची घटना ही घडली आहे. मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे ठेकेदार विकासक यांचे हात मिळवनी करून पाहणी केलेल्या ठिकाणी काम ठेकेदार आपल्या मर्जी करत आहे.तसे येथील नागरिकांचे प्रतिक्रिया आहे. तसेच रस्त्याच्या कडेला नागरिकांना येण्या-जाण्या करण्यासाठी फ्लेवर ब्लॉक लावून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना अभियंता व मुख्याधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. तसेच सदर काम अंदाज पत्रा नुसार नसल्याचे येथील नागरिकांन कडून बोलले जात आहे.तर मुख्याधिकारी व अभियंता हे ठेकेदाराच्या टक्केवारी मध्ये अडकल्यामुळे सदर निकृष्ट दर्जाच्या कामाकडे अभियंता व मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे.दरम्यान प्लेवर ब्लॉक बसवताना जमिनीखाली रबर सोलिंग केली आहे का..? याबाबत बांधकाम अभियंता यांना विचारास अंदाजपत्रकात बघून सांगतो.असे उत्तर देण्यात आले आहे.