बोईसर | प्रतिनिधी
बोईसर येथील मोठे आणि प्रशस्त असे गृहसंकुल असलेले दौलत गार्डन या गृहसंकुलात विकासक अहुरा कंत्रक्शन यांनी नगर रचना विभागातून मंजूर आराखड्या प्रमाणे बांधकाम केले नाही आणि मंजूर आराखडा आणि प्रत्यक्षात विक्री करार यात तफावत आढळून आलेली आहे. या बाबत सदनिका धारक राजेश पोतदार यांनी प्राधिकरणा कडे तक्रार केलेली असून, पोतदार यांच्या सह २४ सदनिका धारकांची फसवणूक आरोप केला आहे.
विकासक केरसी इराणी यांच्या आणि वास्तू विशारद निशांत पाटील यांच्या विरोधात सदनिका धारक राजेश पोतदार यांनी तक्रार दाखल केलेली आहे.या बाबत हकीकत अशी की माहिती अधिकारी कार्यकर्ता राजेश पोतदार यांचा दौलत गार्डन या इमारतीत सदनिका असून त्यांची सदनिका ही विक्री करारा प्रमाणे ९२७ चौ फु असून माहिती अधिकारात इमारतीचा आराखदा काढला त्यात ती सदनिका ७७८चौ फु असल्याचे समोर आले आहे. तसेच विकासक यांनी इमारतीची सोसायटी झाल्यावर आणि भोगवता प्रमान पत्र प्राप्त झाल्यावर पुन्हा स्वतः खोटे प्रतिज्ञा पत्र सादर करून प्राधिकरणा काढून इमारतीची पुनः बांधणी मंजूर करून घेतली आहे. तसेच ह्या गृहसंकुलत रस्ते बांधणीही मंजूर आराखड्या प्रमाणे झाली नसल्याचे आरोप विकासाकावर लावण्यात आले आहेत.विकासक केरसी इराणी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
हा व्यवहार विकासक इराणी आणि त्यांचे ग्राहक पोतदार यांचा आहे, त्यात माझी काही भूमिका नाही,मी आराखडा बनवून दिला आहे,आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे,त्यात मी काय प्रतिक्रिया देऊ.
–निशांत पाटील वास्तूविशरद.हा सर्व गैरप्रकार नगररचना कार्यालयातून आणि जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले आहे. बिल्डर बरोबर आर्थिक व्यवहाराणे हा भ्रष्टाचार होत आहे.
–राजेश पोतदार, तक्रारदार.