मुंबईच्या टोल संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. वाशी, दहीसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड येथील प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवरची टोलवसुली ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. २००२ पासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसुलीचे हक्क मिळाल्याची एमएसआरडीसीची विधानपरिषदेत माहिती दिली आहे.ठाण्यातील वाहनधारकांना मुंबईत ये-जा करण्यासाठी टोलमधून सवलत मिळणार ठाण्यातील छोट्या वाहनांना टोलमधून सवलत देण्यासाठी दोन टप्प्यात टोलनाक्यांवरील व्हिडिओग्राफी पूर्ण झाली आहे. ठाण्यातील वाहनधारकांना मुंबईत येण्यासाठी आणि जाण्यासाठी टोलमधून लवकरच सवलत मिळण्याची शक्यता आहे.मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरु असल्याची सरकारची कबुली रस्त्यांची दूरवस्था असतानाही टोलवसुली सुरू असल्याची कबुली सरकारने विधानसभेत दिली होती. तसेच मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू असल्याची देखील कबुली सरकारनं दिली होती. यानंतर आता मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू असल्याची देखील कबुली दिली आहे. रस्त्याचा खर्च वसूल झाला तरी नागरिकांकडून टोल आकारण्यात येतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह इतर विधीमंडळ सदस्यांनी सरकारकडे टोलसंदर्भात विचारणा केलेली होती. टोलवसुलीचं उद्दिष्ट साध्य करुनही राज्यात टोलवसुली सुरु असल्याची कबुली सरकारने दिली आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या ५५ पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या पाच टोल नाक्यांवर पुलांचा खर्च वसूल होऊनही अद्याप टोल वसुली सुरू असून त्यात दरवाढ करण्यात आली आहे का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला . त्यावर दादा भुसे यांनी उत्तर खरे आहे असे दिले. म्हणजे मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू आहे. मुंबईतल्या ५५ उड्डाणपुलासाठी खर्च १ हजार २५९.३८ कोटी झाला होता. २०२६ पर्यंत ३ हजार २७२ कोटी वसुल होणार आहे. म्हणजे या प्रश्नानंतरही टोलवसुली सुरूच राहणार आहे.राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट दरम्यान, टोलच्या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि सरकारचे अधिकारी यांच्यात टोलबाबत काही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले होते.