पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील चारोटी टोल नाक्यावर दोन ट्रक मध्ये कार चे सॅन्डविच झाल्याची घटना आता ताजी घडलेली असून कार मध्ये परिवार सुरक्षित आहे.शनिवार रविवार आणि किसम्स च्या लागोपाठ आलेल्या सुट्या चे औचित्य साधून बाहेर फिरायला निघालेला परिवाराचे मुंबई गुजरात लेनवर एका ट्रक च्या पाठी टोल भरायला लाईनीत उभ्या असलेल्या कारला पाठीमागे येणाऱ्या ट्रेलरनि जोरदार धडक दिल्याने दोन मोठ्या वाहनात कारचा सॅन्डविच झाला आहे. सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने कार मध्ये असलेला परिवाराला गंभीर अशी दुःखापत झाली नसून, या कार बरोबर दुसऱ्या कार मध्ये असलेल्या परिवारासोबत कार मधील प्रवासी पुढे रवाना झाले आहेत.सुट्याचे दिवस असल्याने रस्त्यात ट्राफिक जाम आणि आज तर खुद्द टोल नाक्यावरच हा अपघात झाल्याने पुन्हा टोल एक झोल हेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिद्ध करून दाखवले आहे.
गुजरात मधील महामार्गांवर सर्व सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध असून घोडबंदर ते अश्च्याड पर्यंतच्या महाराष्ट्रातील महामार्गांवर ब्रिज वर साध्या लाईट नाहीत आणि त्या पुढे गुजरात मध्ये नुसता लाईटचा झगमगात ही आपली महाराष्ट्रातील महामार्गाची अवस्था या कडे लक्ष देते कोण…?
महाराष्ट्रातून निवडून गेलेले आणि गुजरात वर प्रेम करणारे मंत्री असताना रस्ते सुरक्षेची दुसरी कुठली अपेक्षा महाराष्ट्रातील प्रवाश्यांनी करायची..?