Palghar Nargrik

Breaking news

मनोर येथिल बुल शार्क मादीच्या गर्भाशयात मिळाली १५ पिल्ले

पालघर | प्रतिनिधी
मनोर येथिल वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे बुल शार्क माशाने लचके तोडले होते. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. विकी सुरेश गोवारी (वय 32) असे शार्क माशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारच्या सुमारास घडली होती. त्या नंतर तो मासा मृत झाला होता. त्या माशाचे शवविच्छेदन करणारे डॉ. राहुल संखे यांनी आपल्या अहवालात मनोर येथील नदीमध्ये बुल शार्क (देवमासा )आदळून आला. सदर बुल शार्क चा मृत्यू डोक्यावर मार लागल्यामुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. बुल शार्क, खारे पाणी आणि गोडे पाणी दोन्ही सहन करू शकतात, ज्यामुळे त्यांना नद्यांमध्ये आणि नदीत पोहता येते.

सदर माशाचे वनविभाग डहाणू यांच्या आदेशाप्रमाणे पाहणी व शवविच्छेदन दिनांक १३.०२.२०२४ रोजी कारण्यात आले, दरम्यान त्याचे वजन अंदाजे ४५० की. ग्रा.च्या वर आहे, ती मादी जातीची बुल शार्क हॊती, त्याच्या गर्भाश्यातून पिल्लू बाहेर येताना दिसणारी पिशवी दिसत असल्याने गर्भाशयातून लहान बेबी बुल शार्क बाहेर येताना दिसत होता, अजून सखोल गर्भाश्यात हात टाकून तपासणी केली तेव्हा अनेक बेबी बुल शार्क असल्याचे आम्हाला जाणवले, यामध्ये कुठल्याही प्राणायामध्ये जेव्हा गर्भची पूर्ण वाढ़ होते तेव्हा त्याचे डोके गर्भ मुखाच्या बाजूने असते परंतु या माश्यामध्ये त्याचे मागील शेपटीचे फिन आम्हाला जाणावले, प्रत्येक बेबी माशाला वेगळी नाळ व प्लेसनटा बॅग हॊती, गर्भाश्ययात ऐकून १५ पिल्ले हॊती, पिल्लांचे वजन ५ किलो पेक्षा जास्त होते, त्यांना श्रवणेंद्रिय : हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात व तोल सांभाळण्यासाठी मुख्यत: होतो.

बुल शार्क युरीहॅलिन असतात म्हणजेच मीठ आणि ताजे पाण्यात दोन्हीत वाढू शकतात . ते नद्यांच्या वरच्या प्रवासासाठी ओळखले जातात आणि मिसिसिपी नदीपर्यंत अल्टोन, इलिनॉय , समुद्रापासून सुमारे 1,100 किलोमीटर (700 मैल) पर्यंत प्रवास करण्यासाठी ओळखले जातात, परंतु मानवांशी गोड्या पाण्यातील काही संवाद नोंदवले गेले आहेत. मोठ्या आकाराचे बैल शार्क बहुधा जवळच्या किनाऱ्यावरील शार्क हल्ल्यांसाठी जबाबदार असतात , ज्यात इतर प्रजातींना शार्क चावण्याच्या अनेक घटनांचा समावेश होतो. ग्लिफिस वंशाच्या नदी शार्कच्या विपरीत , गोड्या पाण्याच्या अधिवासात टिकून राहण्याची क्षमता असूनही, बुल शार्क खरे गोड्या पाण्यातील शार्क नाहीत.
आफ्रिकेतील झांबेझी शार्क (अनौपचारिकरित्या झांबी ) आणि निकाराग्वामधील निकाराग्वा सरोवर शार्क म्हणून ओळखली जाणारी बुल शार्क ( कार्चरिनस ल्यूकास ) ही रेक्वीम शार्कची एक प्रजाती आहे जी जगभरातील समुद्रकिनाऱ्यांलगतच्या उबदार, उथळ पाण्यात आणि नद्यांमध्ये आढळते. हे त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते आणि मुख्यत: उष्ण, उथळ खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या प्रणालींमध्ये , ज्यात मुहाने आणि (सामान्यत:) नद्यांच्या खालच्या भागात आहे . हा आक्रमक स्वभाव ही त्याची लोकसंख्या IUCN रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध होण्याचे कारण आहे. यापूर्वी गुजरातराज्यात वैविध्यपूर्ण सागरी परिसंस्थेत हे आढळून आलेले आहेत. बुल शार्क हा प्रथमच मनोर येथील नदीत आढल्याने सदर माशाची ओळख करून त्याचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे.असे डॉ राहुल संखे, MVSC, पशु प्रजानन शास्र, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती पालघर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

घडलेली घटना दुर्दैवी असून,आम्ही नदी पात्रात आणि त्या भागात जाण्यास नागरिकांना मनाई केली आहे.या नदी पात्रात दुसरा एखादा असा मासा आहे की नाही..? ही शोध मोहीम सुरु आहे.हा शार्क मासा भरतीच्या वेळी समुद्रातून नदी पात्रात आला असण्याची शक्यता आहे.
–वैभव सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी, मनोर.

हा मासा मादी बुल शार्क असून त्यांनी नदी पात्रात पिल्ले दिले असल्याने अजून मासे या नदी पात्रात असण्याची शक्यता आहे.
–डॉ राहुल संखे, MVSC, पशु प्रजानन शास्र, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती पालघर