पीर कमलीशाह बाबाचा उर्स २ मार्च रोजी
पालघर तालुक्यातील शिरगाव येथील हजरत सैय्यद कमलीशाह बाबा (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळा शनिवारी २ मार्च रोजी होणार आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळणार आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे बाबांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक सातपाटी येथून काढली जाणार आहे. उर्स निमित्त पालघर जिल्ह्यासोबतच पालघर जिल्ह्याबाहेरुन हजारो भाविक बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येतात. कमलीशाह बाबाचा उर्स म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. आम लंगरचा (महाप्रसाद) कार्यक्रम शनिवारी २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे, तर रात्री १० वाजता कव्वाली सामनाचा देखील आयोजन सुन्नी मुस्लिम सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. कव्वालीची मैफिल दरम्यान दिल्ली येथील प्रसिद्ध कव्वाल जुनेद सुलतानी व मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अझीम नाझा आपली आपल्या मधुर आवाजात कव्वालीचा कार्यक्रम सादर करणार आहे.