Palghar Nargrik

Breaking news

जेष्ठ नागरिकांचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

पालघर 
पालघर जिल्ह्याला हादरवून ठेवणाऱ्या कुडण येथिल दोन जेष्ठ नागरिकांच्या खुन्याला नागरिकांना सोबत मिळून अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून,आरोपी किशोर कुमार मंडळ याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर पालघर न्यायालयात हजर केले असता,अधिक तपासासाठी पोलिस कोथडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपी किशोरकुमार मंडळ याला सात मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी हा बोईसर येथिल आरती कंपनी मध्ये कामाला होता, घरातुन दोन ते तीन दिवसापासून तो बाहेर होता, मयत मुकुंद पाटील हे त्यांच्या चिकूच्या वाडीत फेरफटका मारत असताना आरोपी मंडळ हा तेथे झाडाखाली झोपला बसून होता, त्याला मुकुंद पाटील यांनी इथे काय काम , कशाला बसला आहे..?या वरुण वादावादी झाली होती. त्या नंतर मुकुंद पाटील हे वाडीत पाहणी करण्यासाठी पुढे गेले असता,त्याचा राग मनात ठेऊन आरोपीने तेथे जवळ पडलेली कुदळी उचलून त्याच्या पाठीमागून डोक्यात वार करून नंतर मयताच्या छाती वर बसून चेहरा छीन्नविछीन्न करून, नंतर मयताच्या शोधात तेथे आलेल्या त्यांचे भाऊ विठोबा पाटील यांना डोक्यात कुदळ घालून मारले, त्या नंतर तेथून जाणाऱ्या जितेश पाटील यांच्या पाठीमागे धावून त्यांच्यावरही हल्ला केला होता, पण जितेश पाटील हे घरात धावून गेल्याने त्यांच्या जीव वाचला, त्या नंतर जितेश पाटील आणि त्यांच्या वडिलांनी पाठीमागून येऊन आरोपी किशोर कुमार मंडळ याच्या हातातील कुदल काढून घेतल्या नंतर आरोपी त्यांना धक्का देऊन झाडीड पसार झाला होता.त्या नंतर पालघर पोलिस आणि गावातील आणि आस पास च्या गावातील तरुण यांच्या मदतीने गावातील तलावाच्या चिखलात लपलेल्या आरोपी किशोर कुमार मंडळ याला अटक केली आहे,त्या वेळी आरोपी किशोरकुमार याच्या नाका तोंडात चिखल आणि पाणी गेले होते. तसेच त्याच्या अंगावर झखमा झाल्या होत्या, त्या मुळे त्याला पालघर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास बोईसर चे पोलिस उपविभागीय अधिकारी विकास नाईक हे करीत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक यांनी दिली.

या गुन्ह्यात विविध विषय तपासून तपास करण्यात येत आहे, तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी हि घाबरण्याची शक्यता नाही. तसेच जागरूक नागरिकांनी अनोळखी व्यक्तींची माहिती गावातील पोलिस पाटील यांना देने गरजेचे आहे.
–बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक पालघर.