Palghar Nargrik

Breaking news

एसटी च्या पालघर स्वारगेट शिवशाही बस मध्ये झुरळांचा हैदोस

पालघर | मयूर ठाकूर
पालघर डेपोच्या शिवशाही बस मध्ये प्रवश्याना झुरुळ असल्याची तक्रार करण्यात आली असून, सफाई कर्मचारी किंवा मैक्यानिकाल स्टाफ यांचे या कडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. सफाई कर्मचारी किंवा मैकेनिकाल स्टाफ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले क्लार्क किंवा सुपरवायझर ह्यांचे जेवढा पगार घेतो तेवढे काम सुद्धा करत नसल्याचे समोर आले आहे.आपल्या कामानिमित्त प्रामाणिक असणे गरजेचे असताना आपले पाहणीचे काम झाले की लवकर घरी पळून जाणारे क्लार्क असल्यामुळे कर्मचारी काम करीत नसल्याचे काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे.महामंडळाच्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यामुळे महामंडळाचे नाव देशात खराब होत आहे.

या बाबत महामंडळाच्या व्यवस्थापकांशी बोलले असता या वर उपाय म्हणून हिट खरेदी करून फवारणी करण्यात येईल असे सांगितले.पण महामंडळाचा पगार घेऊन काम न करून फुकटचा पगार घेणाऱ्या कारकूनचे काय…? त्यांनी मेकनिकाल नीट काम करतात की नाही हे पाहणे गरजेचे नाही का…?

शिवशाही बस हि आईसोलेटेड बस असल्याने रात्री आल्यावर त्या बस मध्ये हिट मारून फवारणी केली जाते. आम्ही त्या साठी हिट खरेदी केले आहे, तसेच डासा साठी गुड नाईट खरेदी करून लावायला चालक वाहकांना सांगितले आहे. मी आताच ह्या चार्ज घेतला असून लवकरच सुधारणा करणार आहे.
–प्रशांत पांझाडे, डेपो मॅनेजर एसटी महामंडळ पालघर डेपो.