श्राद्धाचे जेवण जेवताना आंदोलक
बोईसर चिल्हार रोड वर सतत होत असलेले बोईसर एमआयडीसी एरिया ते चिलहार फाटा रोड वरील अपघात थांबत नसले बाबत हरकत आणि १४ मार्च २०२४ या तारखेला उपोषणाला एक वर्ष पूर्ण झाले होत असल्याने आतापर्यंत झालेले अपघात आणि त्यात दगावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वर्ष श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनात हिंदू रीती रिवाजा प्रमाणे दुपारी अपघातात मूत्युंमुखी पडलेल्याना घास घालण्यात आला.तसेच संध्याकाळी चार वाजता चिल्हार बोईसर रस्ता खैरा पाडा ब्रिजवर रस्ता रोको करण्यात आला.
बोईसर एमआयडीसी एरिया ते बोईसर जिल्हा रोड मार्ग जो एन एच ४८ मुंबई वडोदरा ला जोडणारा रस्ता आणि आशिया खंडातील सर्वात एकेकाळची सर्वात मोठी एमआयडीसी होती व आहे, अशा एमआयडीसी रोडवर सतत होणारे अपघात लोकसंख्या चे वाढते प्रमाण रस्ते रुंदीकरण न झाल्यामुळे अनाधिकृत बांधकामे रोडवर आल्यामुळे तसेच अनाधिकृत वळणे सरळ रोड नसणे यावेळेस होणारे अपघात शेकडोच्या संख्येने लोकांचे जीव जात आहे २००० सालापासून रोड बनवण्याचे काम सुरू असून आजवर २०२४ पर्यंत रोड पूर्ण झालेल नाही तो पूर्णत्वाला गेला नसल्यामुळे असंख्य लोकांचे जीव जात आहेत अपघात होत आहेत लोकांना अपंगत्व येत आहे जनतेच्या वाहनांचे नुकसानी होत आहे रोडच्या दोन्ही बाजूला लोकसंख्येप्रमाणे मार्जिनल स्पेस न सोडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अनधिकृत दुकाने टपऱ्या पत्राचे शेड उभारले गेलेले आहेत चुकीच्या पद्धतीने वाहने उभी आहेत आणि असं असून सुद्धा प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आणि मात्रा आणि मात्र जनतेच्या जीवाशी खेळण्याचा काम करीत आहे यासाठी जनसामर्थ्य आदिवासी संघटनेमार्फत आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु प्रगती अजून अपूर्ण आहे जर प्रशासनाने त्वरित अनधिकृत बांधकामे रोडवरील अतिक्रमणे हटवली नाही तर त्या साठी हे आंदोलन करण्यात आहे आहे.