–लोकसभा निवडणुकी मध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होणार ….?
मयूर ठाकूर (पालघर)
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यावर अंगडियाचे करोडो रुपये घेऊन जात कुरिअर कंपनीच्या गाडीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले आहे.या बाबत हकीकत अशी कि मुंबई हून गुजरात ला कुरिअर ची गाडी जात असताना श्रावण ठाकूर हे झोप येते म्हणून,तोंड धुवायला थांबले असता,त्यांच्या मागून येणारी गाडी तून पाच जणांनी उतरून पोलीस असल्याची बतावणी करून,गाडीत असलेले अंगदियाची करोडो रुपयांची रोकड आणि चालक आणि अक्षय ठाकूर यांना घेऊन जाऊन नंतर काही अंतरावर सोडून देऊन, रोकड घेऊन पळून गेले.त्या नंतर श्रावण ठाकूर यांनी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर चालक बाबू स्वामी आणि आणखी तिघेजण यांना चौकशी साठी ताब्यात घेतल्यावर चालक बाबू स्वामी यांनी जाणून बुजून गाडी थांबवून हा प्रकार घडवला असल्याचे काबुल केले आहे.त्यात लुटलेली रक्कम मांडवी पोलिसांनी जप्त केली असल्याचे समजते.तसेच हि रक्कम कोणत्या कारणाने घेऊन जात होते ह्याची चौकशी सुरु आहे.
या टोल नाक्यावर सतत सुरक्षा रक्षकांची गस्त असताना लुटीचा प्रकार घडणे हि बाब टोलच्या आणि प्रवाश्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे.
निवडणुकीची आचार संहीता लागू झाल्यावर एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड लुटीमुळे सर्वांच्या सामोरी येणे ह्यावर निवडणुकी मध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होणार ….? हे लोकशाही विकण्याचे लक्षण आहे…?