कुडूस | अमीन मेमन
लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या बीजेपीच्या महाराष्ट्राच्या मा. सचिव व तत्कालीन धारावी विधानसभा च्या निवडणूक प्रमुख. बीजेपी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य यांचे सामाजिक कार्य मुंबई मधील वर्सोवा व धारावी क्षेत्रामध्ये खूपच नावाजलेले आहे . त्यांनी कायम येथे हिंदू मुस्लिम एकता टिकवून ठेवलेली आहे. रमजान असो किंवा दिवाळी असो त्या प्रत्येकाच्या सणांमध्ये सहभागी होऊन काहीतरी भेटवस्तू देऊन सर्वानच्या जोडीला एकत्रित सन साजरा करीत असतात अशा बीजेपीच्या लाडक्या कार्यकर्ता यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामधील शिंदेवाडी गावच्या काही लोकांचे त्यांच्याशी त्यांचे आजोळ वाडा तालुक्यातील असल्याकारणाने घरोबाच्या सबंध होते त्यांनी दिव्याताई यांची त्यांच्या वर्सोवा ऑफिसमध्ये जाऊन भेट घेऊन पालघर जिल्ह्यामधील आमचे गाव एका कोपऱ्यात पडत आहे त्याकडे आपण आपल्या परीने लक्ष देऊन आमच्या गावात कशाप्रकारे सुसज्ज रस्ता बनवून आमच्या गावाची प्रगती होईल व आमच्या मुलांचे भवितव्य उज्वल होईल यासाठी जसे पालघर जिल्ह्यातील भरपूर गावांमध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या येऊन जसा विकास सर्वीकडे घडला आहे तसा विकास आमच्या गावात सुद्धा घडवण्यासाठी आम्हास गावात येण्या जाण्यासाठी आरसीसी रस्त्याची खूपच आवश्यकता आहे अशी मागणी केली असता दिव्यताई ढोले यांनी त्वरित या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्या ओळखीचा व पदाचा वापर करून मा पालकमंत्री व पीडब्ल्यूडी मिनिस्टर मा रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांना विनंती केली असता त्यांनी दिव्याताईंच्या विनंतीला मान देऊन त्वरित 500 मीटरचा आरसीसी उत्तम क्वालिटी चा रस्ता बनवण्याकरिता भरगोस निधी मिळवून दिला व 13 मार्च रोजी या कामाचे वर्क ऑर्डर काढून कामास मंजुरी मिळवून दिली याच कारणास्तव दिनांक 16 मार्च रोजी शिंदेवाडी गावातील रहिवाशांनी मा दिव्याताई ढोले यांना रस्त्याचे कामाच्या सुरुवातीपूर्वी नारळ फोडून कामाची सुरुवात करण्याकरिता आमंत्रित केल्या कारणाने दिव्याताई यांनी त्यांच्या मान स्वीकारून त्यासवंत दिनांक 16 मार्च रोजी सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान हजर राहून आपल्या शुभ हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला आहे त्यानंतर शिंदेवाडी गावकऱ्यांनी दिव्या ताई ढोले यांचे मनापासून आभार मानले आमच्या गावाच्या प्रगतीसाठी आपण जे कार्य केले आहे हे खूपच महान आहे आपण अशाच प्रकारे कायम गरीब दुबळ्या आणि गरजू लोकांच्या कामी येत राहा सेवा करत राहा असे गावातील काही वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांना आशीर्वाद दिले.