जोगेश्वरी | जावेद लुलानिया
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना नेते गजानना कीर्तिकारांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी आज जोगेश्वरी येथिल हिल पार्क सोसायटीत येऊन मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांची भेट घेतली.
अमोल कीर्तिकारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या पित्याच्या समाजसेवाचा मार्गांवर पाऊलावर पाऊल टाकून आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.
या वेळी मुस्लिम बांधवांनी सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे सारख्या युवा नेत्याच्या विजन सोबत असून,या सुरु असलेल्या हुकूमशाही विरोधात आता नाही लढा दिला तर आपले अस्तित्व संपून जाईल असे मत व्यक्त केले.
तसेच अमोल कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात आपण उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या सोबत उभे राहिल्यास लोकशाही विरोधात येणारे नवनवीन चुकीचे कायदे हे लोकशाही ला मारक असून शिवसेना उबाठा गट त्याला मुळा सकट उखडून काढेल असे सांगितले.