मनोर | जावेद लुलानिया
खड्ड्यांमुळे बहुचर्चित असलेल्या मनोर -वाडा-भिवंडी रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमकुवत झाल्याने पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.त्यामुळे भिवंडी,जेनएनएपटी पुणे,कोल्हापूर,गोवा या दिशेने होणार्या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम होणार आहे.या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. हा मार्ग बंद केल्यानंतर वाड्याच्या दिशेने होणारी वाहतूक मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून वळवण्यात आली.
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली होती.मुंबई -अहमदाबाद महामार्गावर व्हाइट टॅपिंगच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना यात आता मनोर -वाडा रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. पावसाळ्यात मनोर- वाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवर पुलावर पडलेले खड्डे दुरुस्त न करता खड्ड्यांमधून अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने पूल कमकुवत झाला आहे.या पुलाबाबत मोठी आंदोलने देखील करण्यात आली. बाजूला पुलाचे बांधकाम देखील सुरू आहे.पण हे बांधकाम पूर्ण व्हायला अजून काहि महिन्यांचा तरी कालावधी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
ठळक /-
या रस्त्यावरील समस्ये संदर्भात खूप आंदोलणे आणि राजकारण झाले आहे. पण समस्येचे समाधान अजून निघाले नाही.